
प्रो कबड्डी लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्सकडून बुधवारी प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रो कबड्डी लीगचा १२ वा हंगाम शुक्रवार, २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ११ रोमांचक हंगामांच्या यशानंतर, पीकेएल आता एका नवीन आणि अधिक उत्साही पर्वात प्रवेश करत आहे.