U Mumba confirm top 8 spot
PKL 2025 points table update after U Mumba and Patna Pirates victories : प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेत रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यू मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. ४० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघ ३७-३७ ने बरोबरीत होते. दरम्यान टाय ब्रेकरमध्ये यू मुंबाने ७- ५ ने बाजी मारली. दिवसाच्या पहिल्या सामन्यात पटना पायरेट्सने हा सामना ३८- २७ च्या फरकाने जिंकला आहे. या सामन्यात पटना पायरेट्सकडून अयानने सर्वाधिक १७ गुणांची कमाई केली.