PKL SEASON 12 PLAYOFFS TO BE HELD IN DELHI
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२५: प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामातील प्लेऑफ्स आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामन्याचे आयोजन दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये केले जाणार आहे. प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. दिल्ली लेग हा या हंगामातील शेवटचा टप्पा असणार आहे. यजमान दबंग दिल्ली के.सी. संघाने देखील दमदार कामगिरी केली आहे. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असून त्यांनी टॉप ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे उर्वरीत ७ स्थांनांसाठी सर्वच संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.