"मुलींनो, सामना जिंकायचा असेल तर..."; कोच पोवार यांचा कानमंत्र

"मुलींनो, सामना जिंकायचा असेल तर..."; कोच पोवार यांचा कानमंत्र भारतीय महिला संघाला इंग्लंडविरूद्ध करावा लागला पराभवाचा सामना Play Fearless If you want to win in international cricket matches says Team India woman team Coach Ramesh Powar
Indian Women Cricketer
Indian Women CricketerSakal

लंडन: आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बिनधास्त खेळायला हवे, असे मत संघाचे मार्गदर्शक रमेश पोवार यांनी व्यक्त केले. इंग्लंडविरुद्धची तिसरी टी२० क्रिकेट लढत भारताने गमावल्यावर पोवार यांनी हे मत व्यक्त केले. भारतीय महिला संघाने इंग्लंडविरूद्धची तिसरी टी२० गमावल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. भारतीय महिला संघाने इंग्लंड फळीच्या दौऱ्यातील एकमेव कसोटी अनिर्णीत राखली, पण एकदिवसीय तसेच टी२० मालिका त्यांना गमवावी लागली. निर्भिड खेळाबरोबरच गोलंदाजी आणि मधल्या फळीची फलंदाजी यात सुधारणा आवश्यक असल्याचे यावेळी पोवार यांनी स्पष्ट केले. (Play Fearless If you want to win in international cricket matches says Team India woman team Coach Ramesh Powar)

Indian Women Cricketer
ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन

"भारतीय महिला क्रिकेट संघाने बिनधास्त खेळ करण्याची आवश्यकता आहे. अर्थात हे एका मालिकेत होणार नाही. त्यांच्या दृष्टिकोनात अचानक बदल करता येणार नाही. हे साध्य करण्यासाठी त्यांना तयार करावे लागेल. त्यासाठी सतत संवाद साधण्याची गरज आहे", असं त्यांनी सांगितले.

Coach-Ramesh-Powar
Coach-Ramesh-Powargoogle

आधुनिक क्रिकेट बिनधास्तपणे, न घाबरता खेळले जाते. मिताली सोडल्यास मधल्या फळीतील हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम राऊत धावा करण्यात अपयशी ठरल्या. हा प्रश्न सोडवणे महत्त्वाचा आहे. मिताली चांगली फलंदाजी करत आहे, पण दडपण कायम राखण्यासाठी अजून एका चांगल्या फलंदाजांची गरज आहे. त्यावर काम करायला हवे", असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com