INDvSA : टी-20 संघातील खेळाडूंना विराटचे आवाहन

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापन अचूक समतोल असलेला संघ असावा यासाठी आग्रही आहे.

धरमशाला : ''टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला अजून वेळ आहे. त्यापूर्वी, संधी मिळेल तेव्हा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करावे,'' असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (ता.15) केले. 

- धोनीसोबतच्या त्या फोटोबद्दल कोहली म्हणतो...​

'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत कोहलीने आपली मते मांडली. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सुरू होण्यास वेळ होता. या सामन्यापूर्वी त्याने ही मुलाखत दिली. तो म्हणाला, ''टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापन अचूक समतोल असलेला संघ असावा यासाठी आग्रही आहे. त्यामुळेच खेळाडूंनी संधी मिळेल, तेव्हा स्वतःला सिद्ध करावे. विश्‍वकरंडकापूर्वी भारतीय संघ जवळपास तीस टी-20 सामने खेळणार आहे. याचा फायदा खेळाडूंनी घ्यायला हवा.'' 

- India vs South Africa : 'विराट सेना' आजपासून लढणार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आम्ही तीनही क्रिकेट प्रकारांकडे लक्ष ठेवल्याचे सांगून कोहली म्हणाला, ''टी20 सामन्याची मालिका ही विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी चाचणी असेल यात शंकाच नाही. पण, आम्ही एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांकडेही लक्ष ठेवून आहोत. कसोटी मालिका ही जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे आम्ही युवा खेळाडूंना योग्य प्रकारे संधी देत आहोत. संघाला पुढे घेऊन जाणारे खेळाडू आम्ही शोधत आहोत. त्यामुळेच खेळाडूंनी आपला खेळ दाखवावा.'' 

- U19 Asia Cup : फायनलमध्ये मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या पोरानं घेतल्या पाच विकेट अन् मग..

धोनीच्या साथीत खेळलेल्या एका सामन्याचा उल्लेख करून ट्‌विट करताना केवळ 'थँक्‍स एमएस' असे लिहिले. आता याचा अर्थ नेटिझन्सनी धोनीच्या निवृत्तीशी कसा जोडला, हे मलाच कळत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली आणि साथीत खेळण्याचा अनुभव वेगळाच होता. 
- विराट कोहली, भारतीय क्रिकेट कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Players have to prove themselves when the opportunity arises says captain Kohli