धोतर - कुर्ता घालून क्रिकेट, संस्कृतमध्ये कॉमेंटरी | playing cricket with dhoti kutra commentary in Sanskrit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

playing cricket with dhoti kutra commentary in Sanskrit
धोतर - कुर्ता घालून क्रिकेट, संस्कृतमध्ये कॉमेंटरी

धोतर - कुर्ता घालून क्रिकेट, संस्कृतमध्ये कॉमेंटरी

क्रिकेट म्हटलं की एकतर पांढरे कपडे किंवा रंगीबेरंगी किट घातलेले खेळाडू आपल्याला दिसतात. मात्र मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अशी स्पर्धा सुरु आहे जिथे खेळाडू धोतर आणि कुर्ता घालून खेळाडू खेळत आहे. याचबरोबर सामन्याचे समालोचनही संस्कृतमधून होत आहे. या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महर्षी वैदिक परिवाराने केले आहे. (playing cricket with dhoti kutra commentary in Sanskrit)

हेही वाचा: आफ्रिदी फिव्हर! PCB ने वयाच्या घोटाळ्यावरुन स्पर्धा केल्या स्थगित

भोपाळमध्ये सुरु असलेली ही स्पर्धा लोकांच्या विशेष पसंतीस उतर आहे. सामन्याची सुरुवात वैदिक मंत्राने होते. तर धार्मिक विधी करणारे पंडित या सामन्यात मैदानात उतरुन षटकार आणि चौकारांचे विधी करताना दिसत आहेत. याबाबत बोलताना एका खेळाडूने सांगितले की ही स्पर्धा संस्कृत भाषेला (Sanskrit Language) प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली आहे. याचबरोबर ते पंडित वैदिक कर्मकांडात सहभागी होतात ते खेळही खेळू शकतात हा संदेश देण्याचाही प्रयत्न यातून केला जात आहे.

हेही वाचा: तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग?

टिळा लावलेल्यांनी लगावले चौकार षटकार

या स्पर्धेत टिळा लावलेले खेळाडू, रुद्राक्ष घातलेले खेळाडू लिलया चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत होते. जरी हे कर्मकांड करणारे खेळाडू असले तरी त्यांच्यामध्ये विजयासाठी एक वेगळीच उर्मी दिसत होती. त्याच्यावर संस्कृतमध्ये होत असलेली कॉमेंटरी स्पर्धेची रंजकता अजूनच वाढवत होती. गेल्या वर्षीही भोपाळमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Playing Cricket With Dhoti Kutra Commentary In Sanskrit In Bhopal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..