esakal | पंतप्रधान आमच्याशी बोलतात याचा परदेशातील खेळाडूंना हेवा; पॅरा एथलीटने सांगितला अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

'पंतप्रधान आमच्याशी बोलतात याचा परदेशातील खेळाडूंना हेवा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. याचा व्हिडिओ रविवारी जारी करण्यात आला आहे.

'पंतप्रधान आमच्याशी बोलतात याचा परदेशातील खेळाडूंना हेवा'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टोकिओ ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. यात पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्ण पदकांसह एकूण १९ पदके जिंकली. यामध्ये ८ रौप्य पदके आणि ८ कांस्यपदकांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या पॅरालिम्पिकमधील ही भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू भारतात परतल्यानंतर त्यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. याचा व्हिडिओ रविवारी जारी करण्यात आला आहे.

मोदींनी याआधी ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिक स्पर्धेच्या कालावधीत वेळोवेळी खेळाडूंसह संघांशी फोनवरून कॉल करून त्यांना प्रोत्साहन दिलं होतं. आता खेळाडूंची प्रत्यक्षात भेट घेतल्यानंतर मोदी म्हणाले की, पॅरा अॅथलीट्सनी टोकियोत जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. पुढेही ते चांगली कामगिरी करतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे.

सर्व पॅरा अॅथलीट्सनी पंतप्रधानांना भेटणं हा आमचा गौरव असल्याच्या भावना व्यक्त केल्या. खेळाडू म्हणाले की, याआधी आम्हाला अपंग म्हटलं जात होतं पण पंतप्रधानांनी त्यांना दिव्यांग संबोधून सन्मान मिळवून दिला. पॅरालिम्पिक स्पर्धेत आम्हाला इतर देशाच्या खेळाडूंकडून सतत विचारणा व्हायची. जेव्हा समजायचं की आमचे पंतप्रधान आमच्याशी बोलतात हे त्यांना समजायचं तेव्हा त्यांना या गोष्टीचा हेवा वाटायचा असंही अॅथलीट्सनी यावेळी मोदींशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा: भाजपने वर्षभरात पाच मुख्यमंत्री बदलले; झारखंड निवडणुकीतून घेतला धडा?

काही खेळाडूंना पॅरालिम्पिकमध्ये मेडल पटकावता आलं नाही. त्यांच्याशी बोलताना मोदी म्हणाले की, तुम्ही मेडल जिंकू शकला नाहीत हे मनातून काढून टाका. तुम्ही तुमची सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदवली आहे आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. पॅरा अॅथलीटस्नी टोकियोत भारताची मान उंचावली.

टोकियो ऑलिम्पिकच्या आधी ५३ वर्षात भारताने ११ पॅरालिम्पिकमध्ये १२ पदकं पटकावली होती. १९६० पासून पॅरालिम्पिक स्पर्धा होते. भारताने १९६८ पासून यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. १९७६ आणि १९८० च्या पॅरालिम्पिकमध्ये भारत सहभागी झाला नव्हता. यंदा भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही मेडल्स जिंकली आहेत. आतापर्यंत एका पॅरालिम्पिकमध्ये २ पेक्षा जास्त सुवर्ण जिंकता आली नव्हती. मात्र यावेळी तब्बल ५ सुवर्णपदकांची कमाई भारतीय पॅरा अॅथलीट्सनी केली आहे.

loading image
go to top