'ही ऐतिहासिक घटना'; मोदींनी वाढवलं थॉमस चॅम्पियन्सचं मनोबल

भारत विश्वविजेता बनल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व बॅडमिंटनपटूंशी साधला संवाद
pm modi interacts badminton champions share experience thomas cup
pm modi interacts badminton champions share experience thomas cup

थॉमस कपमध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने पहिले विजेतेपद मिळाले. थॉमस कप भारताने 73 वर्षांनंतर जिकले आहे. भारत विश्वविजेता बनल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व बॅडमिंटनपटूंशी संवाद साधला, आणि सर्व खेळाडूचे कौतुक केले. पंतप्रधानांनी त्याच बरोबर खेळाडूंशी वैयक्तिकरित्या चर्चा केली.

पंतप्रधान संभाषणात म्हणाले, भारताने 73 वर्षांनंतर थॉमस कप जिंकून इतिहास रचला आहे. याआधी भारतातील लोकांना थॉमस चषक बद्दल माहिती नव्हती. पण तुम्ही जे केले ते इतिहास आहे. भारताने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.(PM Modi Interacts Badminton Champions Share Experience Thomas Cup)

दिग्गज एचएस प्रणॉय यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांच्याशी सामन्याबद्दल चर्चा केली, यावर बॅडमिंटनपटू म्हणाला की, जेव्हा मी कोर्टवर उतरलो तेव्हा माझा एकमेव हेतू होता. शेवटपर्यंत लढायच आणि माझा सर्वोत्तम खेळ खेळायचा. एचएस प्रणॉय म्हणाले की, थॉमसला जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो, हे आमच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.

त्यानंतर पंतप्रधानांनी श्रीकांत किदम्बीशीही संवाद साधला, पंतप्रधानांनी त्याच्याशी थॉमस कप फायनल सामन्याबद्दल बोलले आणि त्याचा अनुभव सांगण्यास सांगितला. सामन्याच्या दबावाबाबत श्रीकांत म्हणाला, आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही ७३ वर्षांनंतर थॉमस कप जिंकला आहे. उपांत्यपूर्व फेरीदरम्यान दडपण होते कारण आम्हाला माहित होते की आम्ही हरलो तर पदक मिळणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com