Wimbledon 2025: पोलंडच्या इगा स्वियातेकनं जिंकलं विम्बल्डन जेतेपद! ११४ वर्षांत असा विजय कुणी मिळवलाच नव्हता

Poland’s Iga Swiatek wins first Wimbledon Grand Slam title विम्बल्डन २०२५ च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पोलंडच्या इगा स्वियातेकने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तिने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाचा अवघ्या ५७ मिनिटांत ६-०, ६-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करत आपले पहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले.
Poland’s Iga Swiatek lifts her first Wimbledon trophy
Poland’s Iga Swiatek lifts her first Wimbledon trophyesakal
Updated on

Poland’s Iga Swiatek claims her maiden Wimbledon title in stunning fashion

पोलंडच्या इगा स्वियातेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवून आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. केवळ ५७ मिनिटांत स्वियातेकने हा विजय मिळवला. २४ वर्षीय स्वियातेकचा हा पहिलाच ऑल इंग्लंड क्लबमधील अंतिम सामना होता, परंतु तिने सुरुवातीपासूनच आत्मविश्वास दाखवला. १९११ नंतर कोणत्याही महिलेने विम्बल्डनमध्ये असा 'डबल बेगल' (एकही गेम न गमावता विजय) मिळवला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com