Gulveer Singh clinched his second gold medal आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताचे पदकाचे खाते गुलवीर सिंगने यानेच उघडले होते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी त्याने पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत सूर्वणपदक जिंकले होते. आज त्याने ५००० मीटर शर्यतीचेही सुवर्ण नावावर केले. त्याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना हे पदक जिंकून इतिहास घडवला. त्याचवेळी महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली.