
मँचेस्टर : आयपीएल संपल्यानंतर लगेचच पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळताना वेगवान गोलंदाजांवर ताण वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी, अशा प्रकारच्या नियोजनामुळे गोलंदाजांची तंदुरुस्ती आणि सातत्य यांवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले आहे.