esakal | उर्वरित IPL सामने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून- BCCI
sakal

बोलून बातमी शोधा

IPL

पुढे ढकलण्यात आलेली इंडियन प्रिमिअर लीग Indian Premier League सर्व काही सुरळीत राहिलं तर 18 किंवा 19 सप्टेंबरला यूएईमध्ये खेळवली जाणार आहे

उर्वरित IPL सामने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून- BCCI

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पुढे ढकलण्यात आलेली इंडियन प्रिमिअर लीग Indian Premier League सर्व काही सुरळीत राहिलं तर 18 किंवा 19 सप्टेंबरला यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीत 10 डबल हेडर खेळवले जाण्याची शक्यता आहे. पीटीआयने बीसीसीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. आयपीएलचा अंतिम सामना 9 किंवा 10 ऑक्टोंबरला होऊ शकतो. (postponed Indian Premier League will resume tentatively on September 18 or 19 in the UAE)

आयपीएलच्या काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने सामने रद्द करण्यात आले होते. आता उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जाणार आहेत. यासाठी बीसीसीआयने तयारी केली असून याबाबतची महत्त्वाची माहिती सांगितली आहे. आयपीएल सामन्यांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सर्वकाही ठरल्यानुसार झाल्यास 18 किंवा 19 सप्टेंबरपासून सामने खेळवले जातील. आयपीएलचे 31 सामने खेळवायचे राहिले आहेत. तीन आठवड्यांच्या कालावधीत ते खेळवून काढण्याचे नियोजित आहे.

हेही वाचा: "अश्विनभाई, मला तुझ्यासारखं व्हिलन बनायचं नाहीये"

4 मेला काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर हे सामने यूएईमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याची माहिती कळत आहे. 10 डबल हेडर आणि 7 सिंगल सामने घेण्याचे नियोजित आहे. 9 किंवा 10 ऑक्टोंबरला आयपीएलचा अंतिम सामना होईल. भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंडसोबतची अखेरची कसोटी 14 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर सर्व भारतीय खेळाडू यूएईसाठी रवाना होतील.