esakal | "अश्विनभाई, मला तुझ्यासारखं व्हिलन बनायचं नाहीये"
sakal

बोलून बातमी शोधा

"अश्विनभाई, मला तुझ्यासारखं व्हिलन बनायचं नाहीये"

"अश्विनभाई, मला तुझ्यासारखं व्हिलन बनायचं नाहीये"

sakal_logo
By
विराज भागवत

मोहाली: IPL 2019 च्या स्पर्धेत गाजलेलं प्रकरण म्हणजे अश्विनने जोस बटलरला मंकडिंग (Mankading) करून तंबूत धाडणं. राजस्थानचा (RR) संघ खूपच चांगला खेळत होता. बटलर (Jos Butter) अर्धशतक ठोकून चांगल्या फॉर्मात होता. पण ऐन मोक्याच्या क्षणी तो चेंडू टाकण्याआधीच क्रीजच्या बाहेर गेला आणि अश्विनने (R Ashwin) त्याला मंकडिंग करुन बाद केलं. या प्रकरणानंतर अश्विनवर खूप टीका (Criticism) झाली. तरीही अश्विन डगमगला नाही. क्रिकेटच्या नियमांना (Cricket Rules) धरून असलेल्या या गोष्टीचा त्याने कधीच पश्चात्ताप केला नाही. अश्विनने त्या पुढच्याच सामन्यात एका युवा गोलंदाजाला मंकडिंगचा सल्ला (Advice) दिला होता, पण त्याच्या सल्ल्यानंतर त्याला फारच विचित्र उत्तर मिळालं. नुकताच एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला. (Team India R Ashwin got Shocking Reply from Young Pacer Ankit Rajput over Mankading Advice in IPL 2019)

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

"बटलरचा किस्सा झाल्यानंतर पुढच्याच सामन्यात मुंबईचा आमच्याशी सामना होता. अल्झारी जोसेफ आणि राहुल चहर फलंदाजी करत असताना त्यांना १ चेंडूत २ धावा हव्या होत्या. अंकित राजपूत शेवटचा चेंडू टाकत होता. मी त्याला म्हटलं की दोन धावा हव्या आहेत त्यामुळे फलंदाज नक्की क्रीज सोडून आधीच धावत सुटणार. तू लक्ष ठेव आणि त्याला मंकडिंग करून बाद कर. हे ऐकून अंकित थोडा घाबरला आणि मला म्हणाला मी असं काही करणार नाही", असा किस्सा अश्विनने सांगितला.

हेही वाचा: रोहित आणि विराटमध्ये फरक काय? शुबमन गिल म्हणतो...

"अंकित शेवटच्या चेंडूसाठी धावणार इतक्यात माझ्याजवळ आला. मला म्हणाला की तुम्ही म्हणताय ते ठीक असलं तरी मी तसं करणार नाही. जेव्हा तुम्ही तसं केलंत तेव्हा खूपच मोठा वाद झाला. तुम्हाला साऱ्यांना व्हिलन ठरवलं. मला तुमच्यासारखं व्हिलन व्हायचं नाहीये", असं अंकितने माझ्याजवळ येऊन पुन्हा सांगितलं. त्यानंतर त्याने चेंडू टाकला आणि त्यात फलंदाजांनी दोन धावा काढून आम्हाला पराभूत केलं. अंकितने माझा सल्ला ऐकला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता असंही अश्विन म्हणाला.