Khelo India 2025 महाराष्ट्राच्या तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद, प्राची गायकवाड, वेदांत वाघमारे यांना सुवर्णपदक

Maharashtra archery champions Khelo India Games 2025 : महाराष्ट्राने खेलो इंडिया या मानाच्या क्रीडा स्पर्धेच्‍या इतिहासात प्रथमच पदकांचा षटकार लगावला. गतवेळी तीन सुवर्णांसह सहा पदके महाराष्ट्राने जिंकली होती.
Khelo India 2025
Khelo India 2025 esakal
Updated on

भागलपूर (बिहार), ता. ७ : महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील बुधवारचा दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तिरंदाजी या खेळामध्ये सहा सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण नऊ पदकांवर मोहर उमटवताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्राने या खेळामध्ये सर्वसाधारण विजेतेपदावरही नाव कोरले. गतवर्षी चेन्नईतील स्पर्धेत महाराष्ट्र या क्रीडा प्रकारात उपविजेता ठरला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com