World Para Badminton Championships : प्रमोद भगतचे सलग तिसरे सुवर्णपदक

भारताचा अनुभवी बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत याने थायलंड येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एसएल थ्री प्रकारात इंग्लंडच्या डॅनियल बेथेल याला पराभूत करीत सुवर्णपदकाची कमाई केली.
Badminton Tournament
Badminton Tournamentsakal

भुवनेश्‍वर : भारताचा अनुभवी बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत याने थायलंड येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एसएल थ्री प्रकारात इंग्लंडच्या डॅनियल बेथेल याला पराभूत करीत सुवर्णपदकाची कमाई केली. प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हे त्याचे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले हे विशेष.

प्रमोद भगत याने याप्रसंगी बॅडमिंटन या खेळातील महान खेळाडू लिन डॅन याच्याही विक्रमाची बरोबरी केली. पाच जागतिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा प्रमोद भगत हा लिन डॅन याच्यानंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. लिन डॅन याने २००६, २००७, २००९, २०११, २०१३ या वर्षांमधील स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली होती. प्रमोद भगत याने २०१३, २०१५, २०१९, २०२२ व २०२४ या वर्षांमध्ये सुवर्णपदक पटकावताना देदीप्यमान कामगिरी केली हे विशेष.

Badminton Tournament
Pro Kabaddi : पाटणा, हरियाना उपांत्य फेरीत

विक्रमी पदक जिंकल्यानंतर प्रमोद भगत म्हणाला, जागतिक स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील पदक हे माझ्यासाठी विशेष ठरले आहे. लिन डॅन हा माझा आदर्श आहे. त्याच्या विक्रमाची मला बरोबरी करता आली आहे. याचा आनंद काही औरच आहे. तसेच जागतिक स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावता आल्याचाही आनंद आहे.

प्रमोद भगत याने या स्पर्धेमध्ये एकेरीसह दुहेरीतही दोन पदके जिंकली आहेत. पुरुषांच्या दुहेरीत त्याने सुकांत कदमच्या साथीने ब्राँझपदकाला गवसणी घातली. तसेच मिश्र दुहेरीत मनीषा रामदास याच्या साथीने आणखी एक ब्राँझपदक पटकावण्यात त्याला यश मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com