Indian Badminton : मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत एचएस प्रणोय आणि किदांबी श्रीकांत यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर दोन ऑलिंपिक पदकांची मानकरी पी.व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली.
क्वालालंपूर : भारताचे अनुभवी खेळाडू एचएस प्रणोय आणि किदांबी श्रीकांत यांनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत शानदार सुरुवात केली, परंतु दोन ऑलिंपिक पदकांचा अनुभव असलेल्या पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.