प्रवीण तांबे आयपीएलला मुकणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

वयाच्या 48 व्या वर्षीही आयपीएल खेळण्यासाठी खरेदी करण्यात आलेला प्रवीण तांबे आता या लीगसाठीच अपात्र ठरला आहे. अबूधाबीतील टी-10 लीग खेळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : वयाच्या 48 व्या वर्षीही आयपीएल खेळण्यासाठी खरेदी करण्यात आलेला प्रवीण तांबे आता या लीगसाठीच अपात्र ठरला आहे. अबूधाबीतील टी-10 लीग खेळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेटपटू केवळ आयपीएलमध्येच खेळतील, असे ठरले आहे. अन्य लीगमध्ये खेळायचे असेल, तर आयपीएल खेळता येणार नाही, असा नियमच आहे. प्रवीण तांबेने टी- 10 च्या ड्राफ्टसाठी आपले नाव पाठवले; तसेच तो आयपीएलच्या लिलावातही होता. हे भारतीय मंडळाच्या आचारसंहितेस धरून नाही, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने तांबेला वीस लाखाच्या पायाभूत रकमेस खरेदी केले होते. 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळलेला तांबेने या लीगमध्ये 28 सामन्यात 33 फलंदाज बाद केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin tambe to miss ipl