Preity Zinta Visits Khatu Shyam Ji: पंजाब किंग्सच्या मालकीन तथा बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने राजस्थानच्या सीकर येथील प्रसिद्ध खाटूश्यामजी मंदिरात दर्शन घेतलं. आयपीएलमधील पंजाब किंग्सच्या शानदार कामगिरीनंतर प्रितीने खाटू श्याम बाबांचा आशीर्वाद घेतला. मंदिर परिसरातील तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, या व्हि़डीओत प्रिती प्रार्थना करताना दिसत आहे.