Premier League: फुटबॉल सामन्यादरम्यान गळा गोलपोस्टला बांधून अनोखे आंदोलन

Premier League Football Just Stop Oil Protest
Premier League Football Just Stop Oil Protest esakal

प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत (Premier League) एव्हर्टन आणि न्यूकॅसल युनायटेड यांच्यातील सामन्यादरम्यान एक अजब प्रकार घडला. हा सामना एका अनोख्या आंदोलनामुळे (Protest) आठ मिनिटे थांबवण्यात आला होता. एका आंदोलकाने गुडीसन पार्क मैदानावरील ग्वालाडेज स्ट्रीट एंडच्या गोलपोस्टला स्वतःला बांधून घेतले. त्याने आपला गळा गोलपोस्टच्या एका खांबाला बांधला होता.

Premier League Football Just Stop Oil Protest
भारताचे शेर ढेर होत असताना 20 वर्षाच्या लक्ष्यने दिला सुखद धक्का

प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये एव्हर्टन आणि न्यूकॅसल यांच्यातील सामन्यादरम्यान हाफ टाईमनंतर एक आंदोलक मैदानात घुसला. या आंदोलकाने 'आधी तेल बंद करा' (Just Stop Oil) असा संदेश दिलेला टीशर्ट घातला होता. त्याने आपला गळा गोलपोस्टला प्लास्टिकच्या पट्टीने (Protester Tied Up Himself With Goal Post) बांधून ठेवला होता. दरम्यान सुरक्षा रक्षकांची आंदोलकाला गोलपोस्टपासून वेगळे करताना मोठी तारांबळ उडाली. हा आंदोलक स्वतःहून मैदान सोडत नसल्याने त्याला बळजबरीने बाहेर काढण्यात आले.

Premier League Football Just Stop Oil Protest
IPL 2022 मध्ये गुजराती संघाबरोबरच गुजराती भाषेचीही एन्ट्री

एका संघटनने या आदोलनाची जबबादारी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, 'आपले सरकार आपल्याला धोका देत आहे. ते उत्तरी समुद्रात नव्या तेल खाणींमध्ये गुंतवणूक करत आहे. नवीन तेल खाण (Oil Field) म्हणजे आपल्या मुलांचे भविष्य उद्धवस्त करणे आहे. याचा अर्थ छोट्या बेटांवर युद्ध. याचा अर्थ गरीबांची परवड होणार आणि सगळ्या भागात विस्थापण होणार.'

न्यूकॅसलने सौदी अरेबियाबरोबर तेलासाठी हातमिळवणी केली असून यात पब्लिक इनव्हेस्टमेंट फंडचा वापर करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटीश पंतप्रधान बॉरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी सौदी अरेबियाला भेट दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com