तुला श्वान मिळाला ना, आता २२ लाख दे! स्टार फुटबॉलरला कोर्टाचा आदेश |Daniel Sturridge | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daniel Sturridge Premier League
तुला श्वान मिळाला ना, आता २२ लाख दे! स्टार फुटबॉलरला कोर्टाचा आदेश

तुला श्वान मिळाला ना, आता २२ लाख दे! स्टार फुटबॉलरला कोर्टाचा आदेश

प्रीमियर लीग (Premier League) या फुटबॉल जगतातील नावाजलेल्या स्पर्धेत खेळलेल्या स्टार फुटबॉलर डॅनियल स्टुरिजला (Daniel Sturridge) त्याच्या श्वानापायी तब्बल २२ लाख ६८ हजार २५८ रुपयांचा भुरदंड बसणार आहे. लीव्हरपूलच्या (Liverpool) ३२ वर्षाच्या माजी स्ट्रायकर (Former Striker) डॅनियल स्टुरिजला लॉस एंजल्स (Los Angeles) न्यायालयाने त्याचे श्वान शोधून देणाऱ्याला २२ लाख ६८ हजार २५८ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Boycott 83 : नवरा-बायकोमुंळ कपिल पाजींच्या सुवर्ण क्षणाला 'ग्रहण'

लीव्हरपूल (Liverpool) कडून खेळणाऱ्या या स्टार फुटबॉलरचे दोन वर्षापूर्वी श्वान त्याच्या लॉस एंजल्सच्या घरातून चोरीला गेला असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने जो कोणी आपला श्वान आपल्याला परत मिळवून देईल त्याला आपण बश्रीस देणार असल्याचे घोषित केले होते.

या पामेरियन श्वानाचे (Pomeranian Dog) नाव आहे लुसी. हा हरवलेला श्वान लॉस एंजल्समधील स्थानिक रॅपर फोस्टर वॉशिंग्टन (Foster Washington) याला सापडला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून ताटातूट झालेल्या डॅनियल स्टुरिजची आणि श्वानाची पुन्हा भेट घडवून आणली.

हेही वाचा: Asia Cup, IND vs PAK: पाकनं उडवला धूल सेनेचा धुरळा!

मात्र स्टुरिजने त्याचा श्वान शोधून देणाऱ्याला २२ लाख रुपये देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे रॅपर असलेला फोस्टर वॉशिंग्टन (Foster Washington) कोर्टात गेला. मात्र स्टुरिजने कोर्टाच्या नोटीसला उत्तरच दिले नाही. अखेर कोर्टाने स्टुरिजला २२ लाख ६८ हजार २५८ रुपये फोस्टरला देण्याचा आदेश दिला.

कोर्टाच्या या आदेशानंतर फोस्टर म्हणाला की, स्टुरिजने (Daniel Sturridge) त्याची निराशा केली होती. मला आशा आहे की तो आता मला माझे पैसे देईल आणि कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही. फोस्टर पुढे म्हणाला 'मी याबाबत खूप उत्साही आहे. मी ही केस गेले वर्षभर लढत आहे. मला विश्वास बसत नाही की मी हा लढा जिंकला आहे. ज्यावेळी मला हा श्वान मिळाला होता त्यामुळे मला वाटले की माझे आयुष्य आता सुधारणार आहे.'

मात्र रॅपर फोस्टर वॉशिंग्टनने सांगितले की अजून स्टुरिजने त्याला पैसे दिले नसल्याचे सांगितले. याबाबत प्रतिक्रियेसाठी स्टार फुटबॉलरच्या प्रतिनिधिंशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अजून त्यांच्याकडून यावर प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

Web Title: Premier League Star Daniel Sturridge Ordered To Pay 22 Lack To A Man Who Found His Lost Dog

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..