President Draupadi Murmu
President Draupadi Murmu

Video: राष्ट्रपतींनी सायना नेहवालसोबत लुटला बॅटमिंटनचा आनंद; खेळ पाहून तुम्हीही कराल कौतुक

राष्ट्रपती भवन इथल्या बॅटमिंटन कोर्टवर या दोघांमध्ये सामना पार पडला.

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताची फुलराणी सायना नेहवालसोबत बॅटमिंटन खेळण्याचा आनंद लुटला. राष्ट्रपती भवन इथल्या बॅटमिंटन कोर्टवर या दोघांमध्ये सामना पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या खेळातील कौशल्याची चुनूकही दाखवली. (President Droupadi Murmu played badminton with ace shuttler Saina Nehwal)

राष्ट्रपतींचा हा बॅटमिंटन खेळतानाचा व्हिडिओ खुद्द राष्ट्रपती भवनकडून शेअर करण्यात आला आहे. २३ सेकंदाच्या या व्हिडिओत मुर्मू या नेहवाल यांच्यासोबत बॅटमिंटन खेळताना दिसत आहेत. यावेळी कार्यालयातील अधिकारी वर्ग आणि काही लहान खेळाडू देखील कोर्टवर हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे.

President Draupadi Murmu
Green Pathway: यवतमाळमध्ये होणार 'ग्रीन पाथवे'चा विस्तार; 3,000 शेतकरी कुटुंबांना मिळणार 'जल सुरक्षा'

दरम्यान, राष्ट्रपतींनी पास केलेल्या बॅठमिंटनच्या फूल परत टोलवताना साईनाला देखील कष्ट घ्यावे लागल्याचं दिसून आलं. उलट दोन वेळेस तिला आपले पॉईंट गमवावे लागले. यामुळं राष्ट्रपती मुर्मू यांचं उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून कौतुकही केलं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं.

आपल्या रोजच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बॅटमिंटन खेळण्याचा आनंद लुटल्यानं त्यांच्यातील खिलाडू वृत्तीचंही यावेळी देशाला दर्शन घडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com