Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Major Dhyan Chand Khel Ratna Award
Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्कारने सन्मान

Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रासह 12 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ले. क्रीडा क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कारासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह क्रिकेट क्षेत्रातून महिला क्रिकेटर मिताली राज तर फुटबॉल जगतातून सुनील छेत्रीच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. या सर्व खेळाडूंना राजभवनात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकाची कमाई केली होती. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून हा पुरस्कार हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार अशी घोषणा केली होती. 12 खेळाडूंना हा पुरस्कार प्रधान करण्यात आल्या.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी

- नीरज चोप्रा

- रवि दहिया

- लोवलिना बोर्गोहिन

- पीआर श्रीजेश

- अवनी लेखारा

- सुमित अंतिल

- प्रमोद भगत

- मनीष नरवाल

- मिताली राज

- सुनील छेत्री

- मनप्रीत सिंह

loading image
go to top