पृथ्वी शॉचं ब्रेकअप! गर्लफ्रेंडने केलं अनफॉलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वी शॉचं ब्रेकअप! गर्लफ्रेंडने केलं अनफॉलो
पृथ्वी शॉचं ब्रेकअप! गर्लफ्रेंडने केलं अनफॉलो

पृथ्वी शॉचं ब्रेकअप! गर्लफ्रेंडने केलं अनफॉलो

टीम इंडियातील मुंबईकर ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा त्याच्या आक्रमक बॅटींगबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. दरम्यान क्रिकेट जगतात त्याच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.

प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ सतत एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटींवरून त्यांच्या नात्यातील जवळीक कळू शकते, पण आता दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यानंतर त्यांच्यातील ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी प्राची पृथ्वीच्या क्रिकेटमधील यशाचा आनंद इन्स्टाग्रामवर साजरा करत. हे दोघंही एकमेकांना फॉलो करत तसंच त्यांच्यातील सोशल मीडियावरील केमिस्ट्री ही फॅन्सच्या चर्चेचा विषय होती.

२०२० मध्येही दोघांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. २२ वर्षीय पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत असतात.

पृथ्वीने एकदा दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉंटिंगसोबत काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर प्राचीने कमेंट केली होती. यावरुन त्यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ सतत एकमेकांना डेटदेखील करत होते.

कोण आहे प्राची सिंग?

पृथ्वी शॉची चर्चित गर्लफ्रेंड प्राची सिंग ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर अनेकदा बेली डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. प्राचीने २०१९ मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. कलर्स टीव्ही शो 'उडान'मध्ये तिने वंशिका शर्माची महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती प्रचंड गाजली, ती एक चांगली अभिनेत्री तसेच उत्तम डान्सरही आहे. सोबतच, ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ४० हजार फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :Prithvi Shaw