काळजी घेतली नाही; पृथ्वी शॉची कबुली

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

काळजी न घेतल्यामुळे उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी ठरल्याची कबुली पृथ्वी शॉ याने दिली. निलंबन हा नशिबाचा भाग असून तो अत्यंत गांभीर्याने स्वीकारू. या धक्‍यातून सावरत भक्कम पुनरागमन करू, असा निर्धारही त्याने व्यक्त केला. 

मुंबई ः काळजी न घेतल्यामुळे उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी ठरल्याची कबुली पृथ्वी शॉ याने दिली. निलंबन हा नशिबाचा भाग असून तो अत्यंत गांभीर्याने स्वीकारू. या धक्‍यातून सावरत भक्कम पुनरागमन करू, असा निर्धारही त्याने व्यक्त केला. 

पृथ्वीने एक निवेदन ट्‌वीटरवर पोस्ट केले आहे. त्याने म्हटले आहे की, "मी पुन्हा खेळण्यास आतुर होतो. त्यातून मी तज्ञांचा सल्ला न घेता कफवरील साधे औषध खरेदी केले. त्यात मी योग्य प्रक्रियेचा अवलंब केला नाही. तशी काळजी घेतली नाही.' 

क्रीडा क्षेत्रातील इतर व्यक्ती यातून बोध घेतील आणि औषधे घेताना अतिशय काळजी घेतील अशी आशाही त्याने व्यक्त केली. 

क्रिकेट हे माझे जीवन आहे. भारत आणि मुंबईसाठी खेळण्याशिवाय जास्त अभिमानाची कोणतीही गोष्ट नाही. मी यातून वेगाने आणि कणखरपणे सावरेन. - पृथ्वी शॉ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithvi Shaw Comment on BCCI suspends for doping violation