ही काय गडबड? बंदी असूनही पृथ्वी शॉचे नाव संघात

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई क्रिकेट असोसिएशनने कॅम्पमध्ये सहभागी असणाऱ्या खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर केली ज्यामध्ये पृथ्वीचेही नाव होते...

मुंबई : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यावर अजाणतेपणे उत्तेजक सेवन केल्यामुळे आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी ऑफ सीजन कॅम्पसाठी मुंबईच्या संघात 37 खेळाडूंसह संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने कॅम्पमध्ये सहभागी असणाऱ्या खेळाडूंची यादी शुक्रवारी जाहीर केली ज्यामध्ये पृथ्वीचेही नाव होते. 

"निवड समितीने या खेळाडूंची निवड 16 जूनलाच केली आहे त्यावेळी पृथ्वीवर बंदी नव्हती इयत्ता दोन तीन आठवड्यांमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी इंदोर अॅकॅडमीमध्ये हा कॅम्प सुरू होईल.  मात्र आता पृथ्वीवर बंदी असूनही त्याचे नाव यादीत का आहे याबद्दल मला कोणतीही माहिती नाही," अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

पृथ्वीच्या बंदीचा कालावधी 16 मार्च ते 15 नोव्हेंबर आहे. नियमानुसार पृथ्वीचा 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून आपल्या राज्याच्या संघाबरोबर प्रशिक्षण सुरू करू शकता. त्याच्यावर असलेल्या बंदीमुळे भारतात होणार बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला तो मुकणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithvi Shaw included in Camp team by Mumbai Cricket Association