'...तर तुझाही विनोद कांबळी होईल'; पृथ्वी शॉ झाला ट्रोल!

टीम ई-सकाळ
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

माझे काम केवळ धावा करण्याचेच आहे. माझ्या जास्तीत जास्त धावा कशा होतील, संघासाठी सामने कसे जिंकून देता येतील, याकडे लक्ष केंद्रित करण्याचेच माझे काम आहे.

मुंबई : आसामविरुद्धच्या पुनरागमनाच्या सामन्यात अर्धशतक केल्यानंतर बॅट उंचावत अर्धशतकाचा आनंद व्यक्त केल्याचा पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्‌विटर पेजवरून पोस्ट केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शॉला चांगलेच लक्ष्य केले आहे. 

आसामविरुद्धच्या अर्धशतकाचा आनंद व्यक्त करण्याची काय गरज आहे? याउलट बंदी झाल्यानंतर खेळायला मिळणं हिच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नम्र होण्याची आणि खेळाची आब राखण्याची गरज आहे, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

तर अतिआत्मविश्वासू क्रिकेटपटू जास्त वेळ टिकत नाहीत, असे एका चाहत्याने म्हटले. आणखी एकाने बॅट बोलत असताना अन्य काही करण्याची गरज नसते, असेही पृथ्वीला सुनावले आहे. पृथ्वी शॉ हा दुसरा विनोद कांबळी होणार असं एकाचं म्हणनं आहे, तर एकाने 'पृथ्वीला निष्कारण मोठे केले जाते, त्याला किती ऍटिट्यूड आहे,' अशीही टिप्पणी केली आहे. 

माझे काम केवळ धावा करण्याचेच आहे. माझ्या जास्तीत जास्त धावा कशा होतील, संघासाठी सामने कसे जिंकून देता येतील, याकडे लक्ष केंद्रित करण्याचेच माझे काम आहे. संघनिवडीचा निर्णय निवड समिती घेत असते, असे सांगताना जणू पृथ्वी शॉ भविष्यात माझी फक्त बॅट बोलत राहील, अशाच तोऱ्यात सांगत होता.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- कसोटी सामन्यांमध्ये होणारे हे नुकसान लक्षात कोण घेतो?

- मोहम्मद शमी कारकीर्दीत सर्वोच्च स्थानी; जडेजा, अश्विनही 'टॉप टेन'मध्ये!

- INDvsBAN : क्रिकेटचा आदर राखणे महत्त्वाचे : मयांक अगरवाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithvi Shaw trolled for over confident gesture in comeback game of Syed Mushtaq Ali Trophy