वाईच्या प्रियांकाचा दोन पदकांचा वेध

संजय घारपुरे - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सातारा - वाईच्या प्रियांका कासुर्डे हीने राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धेत इंडियन राउंड प्रकारात दोन रौप्यपदके जिंकली खरी, पण आता घरचे प्रोत्साहन आहे; पण आर्थिक पाठबळ नसताना इंडियन राउंडमधून आंतरराष्ट्रीय प्रकाराच्या स्पर्धेत कसे जाणार? हा प्रश्‍न तिला सलत आहे.

छत्रपती शाहू स्टेडियमवरील या स्पर्धेत सातारा कन्या प्रियांकाने इंडियन राउंड प्रकारात चाळीस मीटर स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदक जिंकले. तसेच तिने औरंगाबादच्या दिनेश लगड याच्या साथीत मिश्र दुहेरीत रौप्यपदकही पटकावण्याचा पराक्रम केला. या यशानंतरही तीस मीटर शर्यतीच्या वेळी वाऱ्याशी सांगड घालता आली असती, तसेच मिश्र दुहेरीच्या स्पर्धात दोघांचीही कामगिरी थोडी चांगली झाली असती, तर अधिक चांगले यश मिळाले असते, असे तिला वाटत आहे.

बीकॉमच्या दुसऱ्या वर्षास असलेली प्रियांका वाईतील ओम श्री सोशल अँड स्पोर्टस फाउंडेशन या क्‍लबची. ती एका शेतात सहकाऱ्यांबरोबर सराव करते. त्यामुळे वाऱ्यात लक्ष्य साधण्याची सवय होते. मित्रमैत्रिणी तिरंदाजी करत असल्यामुळे या खेळाकडे वळलेल्या प्रियांकास महाराष्ट्रास आपण मिश्र दुहेरीचे पदक जिंकून देऊ शकलो, याचे समाधान आहे. आम्ही सेट दोन नाही तर एका गुणाने हरलो, तर एक बरोबरीत सुटला. ही लढत नक्कीच जिंकता आली असती, असे ती सांगते.

Web Title: priyanka kasurde