
Pro Kabbadi 11: वेगवान आणि खोलवर चढाई करणाऱ्या आशु मलिकच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वात सोमवारी दबंग दिल्लीने घरच्या मैदानावर पुणेरी पलटणचा ३०-२६ असा पराभव केला. या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली.
पुणेरी पलटण मात्र सातव्या स्थानावर राहिले. यामुळे गतविजेत्या पुणेरी पलटणला आता उर्वरित प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. अन्यथा त्यांना बाद फेरी गाठता येणार नाही.