
Pro Kabaddi 11: पिछाडीवर असतानाही कोणतेही दडपण न घेता उत्कृष्ट अष्टपैलू खेळ करीत हरियाना स्टीलर्स संघाने पाटणा पायरेट्स संघाला ४२-३६ असे हरविले. प्रो कबड्डी लीग या सामन्यात मध्यंतराला पाटणा संघाकडे १७-१६ अशी केवळ एक गुणाची नाममात्र आघाडी होती.
या स्पर्धेत हरियाना संघाने १६ सामन्यांत १३वा विजय नोंदवला. यामध्ये हरियानाच्या शिवम पटारे याने ११, मोहम्मद रेझा शादलूइने नऊ आणि संजय याने पाच गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, पाटणा संघाकडून देवांकने १३ गुण मिळवले. हरियानाने गुणतक्त्यातील अव्वल स्थान कायम ठेवले आहे.