
Pro Kabaddi 11: जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो कबड्डी स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या लढतीत गुजरात जायंट्स संघावर ४२-२९ असा विजय मिळवला आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. मध्यंतराला जयपूर संघाने २७-१६ अशी आघाडी मिळविली होती.
जयपूर संघाने नवव्या विजयासह ५४ गुणांची कमाई केली आहे. त्यांचा संघ सहाव्या स्थानावर आहे. गुजरातचा संघ ११व्या पराभवासह ११व्या स्थानावर आहे.