
Australia vs India Day Night Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिवस-रात्र पद्धतीने ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने विजय मिळवला.
मात्र हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यात झालेल्या वादामुळे अधिक गाजला. याबाबत त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून कारवाई देखील करण्यात आली. आता या आयसीसीच्या कारवाईवर मोहम्मद सिराजने प्रतिक्रिया दिली आहे.