
Patna Pirates beat Jaipur Pink Panthers : पाटणा पायरेट्स संघाने सहा गुणांच्या पिछाडीवरून उत्तरार्धात सामन्याला कलाटणी दिली आणि जयपूर पिंक पँथर्स संघावर ३८-२८ असा रोमहर्षक विजय नोंदविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेत मध्यंतराला जयपूर संघाकडे १८-१२ अशी आघाडी होती.