
Pro Kabaddi 11: यूपी योद्धाज संघाने प्रो कबड्डी स्पर्धेतील मंगळवारच्या साखळी फेरीच्या लढतीत उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत हरियाना स्टीलर्स संघावर ३१-२४ असा सनसनाटी विजय नोंदविला. या विजयासह त्यांनी प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. मध्यंतराला यूपी योद्धाज संघाकडे दोन गुणांची आघाडी होती.