Patna Pirates vs Puneri Paltan PKL 2025
esakal
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या १२ व्या हंगामातील २२ वा सामना पुणेरी पलटन आणि पटना पायरेट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पटना पायरेट्सकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. दोन्ही संघातील चढाईपटूंनी एकसमान गुण कमावले. पण बचावत पुणेरी पलटनचा संघ मागे पडला. अयान एकटाच पुणेरी पलटनवर भारी पडला. हा सामना पटना पायरेट्सने ४८- ३७ च्या फरकाने आपल्या नावावर केला.