
UP Yoddhas vs Telugu Tiatans : पूर्वार्धात सात गुणांनी पिछाडीवर असलेल्या यूपी योद्धाज संघाने बुधवारी प्रो कबड्डी स्पर्धेतील लढतीत तेलुगू टायटन्स संघावर ३६-३३ असा तीन गुणांनी निसटता विजय साकारला. यूपी योद्धाज संघ मध्यंतराला १७-१० असा पिछाडीवर होता. त्यानंतर यूपी योद्धाज संघाने उत्तरार्धात झोकात पुनरागमन करीत विजयाला गवसणी घातली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेत कर्णधार विजय मलिक याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तेलुगू टायटन्स संघाने सुरुवातीपासूनच यूपी योद्धाज संघाविरुद्ध आघाडी घेतली. या लढतीच्या आठव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण नोंदविला. त्यामुळे त्यांना १०-४ अशी आघाडी घेता आली.