
रविवारी फिफा क्लब वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद प्रीमियर लीगमधील संध चेल्सी क्लबने जिंकले. अंतिम सामन्यात चेल्सीने बलाढ्य पॅरिस सेंट-जर्मेन संघाला ३-० अशा फरकाने पराभूत केले. हे तिन्ही गोल चेल्सीने पहिल्या हाफमध्येच केले होते.
चेल्सीकडून २२ व्या आणि ३० व्या मिनिटाला कोल पामरने गोल केला, तर ४३ व्या मिनिटाला जावो पेड्रोने गोल केला. मात्र, हा सामना अत्यंत तणावाच्या वातावरणात झाला, सामन्यानंतर तर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचे पाहायला मिळाले.