PSL Video Erin Holland : पाकिस्तानात हे चाललंय काय... महिला समालोचकला उचलून थेट घेतलं कडेवर अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PSL Video Erin Holland

PSL Video Erin Holland : पाकिस्तानात हे चाललंय काय; महिला समालोचकाला उचलून थेट घेतलं कडेवर अन्...

PSL Video Erin Holland : पाकिस्तानात सध्या पाकिस्तान प्रीमियर लीगचे सामने सुरू आहेत. हे सामने सुरू असताना स्टेडियमबाहेर गोळीबार, बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या आपण वाचत होतो. पीएसएल खेळापेक्षा याच कराणांनी गाजत होते. मात्र आता स्टेडियममधून आलेल्या एका व्हिडिओमुळे पीएसलच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे.

पाकिस्तान सुपर लीगमधील एका सामन्यादरम्यानचा समालोचक डॅनी मॉरिसन आणि बेन कटिंगची पत्नी, क्रिकेट प्रेझेंटर एरिन हॉलँड याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे PSL च्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी समालोचक मॉरिसनने एरिनला आपल्या कडेवर घेत गोल गोल फिरवले. हा व्हिडिओ जरी फनी वाटत असला तरी अनेक लोकांना हा व्हिडिओ आवडलेला नाही. याचा संबंध हा महिलांच्या सन्मानाशी जोडला जात आहे.

विशेष म्हणजे या सामन्यात एरिनचा पती बेन कटिंग देखील खेळत होता. मॉरिसनचे अनेकवेळा अशे चित्र विचित्र वागणे आपण पाहिले आहे. खेळाडूंना ट्रोल करण्यात त्याचा हातखंडा आहे. आता तर त्याने थेट खेळाडूच्या पत्नीलाच आपल्या कडेवर उचलून घेतले.

आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडिओ एरिनने आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केला. यावेळी तिने मॉरिसनला अंकल असे संबोधले. तर मॉरिसनने देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत त्याला मिसेस कटिंग मी तुला फक्त तुला सज्ज करतोय (Keeping On Your Toes)'

मॉरिसन यांनी पीएसएल मध्येच असे प्रकार केलेले नाहीत तर आयपीएलमध्ये समालोचन करताना देखील त्यांनी चिअर गर्ल्संना उचलण्याचे कारनामे केले आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर