
पुणे, धाराशिव या संघांनी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या हीरकमहोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहर उमटवली. महिला विभागात धाराशिवने सांगलीचा, तर पुरुष विभागात पुण्याने मुंबई उपनगरचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. पुण्याने ही कामगिरी सलग दुसऱ्या वर्षी केली, हे विशेष. अहिल्यानगर, शेवगाव येथील खंडोबा मैदानावर हीरकमहोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा पार पडली.