Basketball: सोलापूर अजिंक्यपद स्पर्धा, पुणे जिल्हाच्या दोन्ही संघांचा अंतिम फेरीत प्रवेश; उपांत्य लढतीत नागपूर व साताऱ्याचा पराभव
Pune Basketball: सोलापूर येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यातील दमदार कामगिरीने पुणे खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.
पुणे : सोलापुर येथे सोलापुर शहर व जिल्हा बास्केटबॉल संघटना आयोजित ५०व्या तेरा वर्षांखालील (सब-ज्युनिअर) गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हाचे दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली आहे.