
Pune vs Osmanabad basketball match
esakal
पुणे : सोलापूर येथे सोलापुर शहर व जिल्हा बास्केटबॉल संघटना आयोजित ५०व्या सब-ज्युनिअर गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे संघाने उस्मानाबादला हरवून आपली आगेकूच कायम राखली आहे. अन्य लढतीत मुलींच्या गटात ठाणे आणि मुलांच्या गटात सोलापुर, व कोल्हापुर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.