esakal | क्रीडा विद्यापीठ याच वर्षी सुरू होणार; कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू

बोलून बातमी शोधा

Sports_University}

२०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे आहेत अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.

क्रीडा विद्यापीठ याच वर्षी सुरू होणार; कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू
sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : बालेवाडी येतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पात केली असली तरी त्यासाठीची तयारी यापूर्वीच सुरू झाली आहे. प्रशासकीय व इतर अत्यावश्यक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. येत्या शैक्षणिक वर्षातच क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाईल, अशी माहिती क्रीडा व युवा संचलनालयाने दिली आहे.

JEE Main Result 2021: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल​

बालेवाडी स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असल्याने तेथेच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा गेल्यावर्षी करण्यात आली होती. पण कोरोनामुळे त्याच्या कामात अडथळे आले होते. मात्र, आता या कामाने पुन्हा एकदा गती पकडली आहे.

या ठिकाणी क्रीडा विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा शिक्षण व प्रशिक्षण हे चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे आहेत अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.

मेडिकलला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; यंदा पदवीच्या जागा वाढणार!​

क्रीडा विद्यापीठासाठी सुमारे ४०० कोटीची तरतूद करण्यात आली असून, त्याबाबत यापूर्वी चर्चा झालेली आहे. सध्या विद्यापीठासाठी कुलगुरू निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुलगुरू निवडीनंतर अभ्यासक्रमांची रचना ठरणार, प्रवेशासाठी पद्धत कशी असेल, विद्यार्थ्यांसाठी पात्रतेच्या अटी याबाबत स्पष्टता येणार आहे.

‘‘क्रीडा विद्यापीठासाठी १३३ पदसंख्या मंजूर करण्यात आली आली असून, सध्या शासन स्तरावर कुलगुरू निवडीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. या विद्यापीठाच्या कामासाठी ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याबाबत यापर्वी चर्चा झालेली आहे. स्टेडियममुळे आवश्‍यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तर कार्यालय व इतर सुविधांचे काम सुरू असून, तेथे विद्यार्थ्यांची निवासाची देखील व्यवस्था असेल. या वर्षापासूनच क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे.’’
 - ओमप्रकाश बकोरीया, आयुक्त, क्रीडा विभाग

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)