मेडिकलला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; यंदा पदवीच्या जागा वाढणार!

Students_Medical
Students_Medical

पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी कमी जागा असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते, मात्र, आता यात काहीसा दिलासा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने नवे सात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशाच्या दोन हजार जागा वाढून प्रवेश क्षमता सुमारे ६ हजार ३०० पेक्षा जास्त होणार आहे. तर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा मानस असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

२०२१-२२ च्या अर्थसंकल्प सोमवारी (ता.८) विधानसभेत वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या २४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत, त्यामध्ये सुमारे सुमारे ४ हजार ३३० हजार वैद्यकीय प्रवेशाच्या जागा आहेत. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयात २ हजार २७० जागा आहेत. राज्य सरकारने सात जिल्ह्यांमध्ये नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवेश क्षमता वाढणार आहे.

सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढ आणि स्थापन होणाऱ्या नवीन शासकीय महाविद्यालयांमुळे पदवी स्तरावरील १ हजार ९९० जागा वाढणार आहेत. पदव्युत्तर पदवीच्या १ हजार आणि विशेषज्ञांच्या २०० जागा वाढणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी जमीन, पायाभूत सुविधा, बांधकाम, वित्त पुरवठा, संचालन व देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीचे धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील नामांकित असलेल्या मुंबईतील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

सध्याची वैद्यकीय महाविद्यालयांमधील क्षमता :
शासकीय महाविद्यालये - २४
प्रवेश क्षमता - ४३३०
खासगी महाविद्यालये - १८
प्रवेश क्षमता - २२७०
शासकीय दंत महाविद्यालये - ४
प्रवेश क्षमता - ३३६
खासगी दंत महाविद्यालये - २५
प्रवेश क्षमता - २३५०

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com