

UCI WORLD CHAMPIONSHIPS 2032 in Pune
Sakal
UCI WORLD CHAMPIONSHIPS 2032 in Pune: भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप २०३२ आयोजित करण्याचा मान मिळाला असून, या स्पर्धेचे यजमानपद पुण्याला मिळाले आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांसाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी भारत सरकारच्या सहकार्याने संयुक्तपणे ही उमेदवारी सादर केली. पुण्याला जागतिक सायकलिंग केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात सायकलिंगचा दीर्घकालीन वारसा निर्माण करण्याच्या सामायिक दृष्टिकोनातून ही उमेदवारी उभारण्यात आली होती.