
प्रो कबड्डीचा ११ वा हंगाम काही महिन्यांपूर्वीच संपलेला असताना आता १२ व्या हंगामाची उत्सुकता वाढली आहे. प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामाचा लिलाव ३१ मे आणि १ जून रोजी मुंबईत होणार आहे. या लिलावात अनेक मोठी नावं असणार आहेत, ज्यांच्याकडे लक्ष असेल. असे असतानाच अस्लम इनामदारला मात्र पुणेरी पलटनने विश्वास दाखवून संघात कायम केले आहे.
२५ वर्षीय अस्लम गेल्या काही हंगामापासून पुणेरी पलटणचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. अष्टपैलू अस्लम १२ व्या हंगामातून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. त्याच्यासाठी ११ वा हंगाम आव्हानात्मक राहिला. त्याला ७ सामन्यांनंतर गुडघ्याची दुखापत झाली होती. पण आता तो पुन्हा मैदानात परतण्यास सज्ज आहे.