Arnav Paparkar's Historic Wimbledon Run Ends
esakal
18-Year-Old Arnav Paparkar Scripts History: पुण्याच्या अर्णव पापरकरचा विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपला. जॉर्डन लीने ६-२, ७-५ अशा फरकाने १८ वर्षीय अर्णवला पराभूत केले. पण, उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून अर्णवने ऐतिहासिक कामगिरी केली. ३६ वर्षांनंतर विम्बल्डन ज्युनियरच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९९० मध्ये महान टेनिसपटू लिएंडर पेस याने ही कामगिरी केली होती.