Pune girl Shreyasi Joshi creates history with skating gold : पुण्याच्या श्रेयसी जोशी हिने कोरियात सुरू असलेल्या आशियाई रोलस स्केटिंग स्पर्धेत Inline Freestyle-Classic Slalom प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली असून, तिच्या या यशामुळे भारताच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. आशियाई पातळीवर तीव्र स्पर्धा असताना श्रेयसीने अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रगल्भतेने आपली कला सादर केली. तिच्या शानदार कामगिरीमुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः पुणेकरांसाठी ही गौरवाची बाब आहे.