पीव्ही सिंधू, प्रणॉय यांचा Singapore Openच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaysia Badminton Open P V Sindhu HS Prannoy Reached In Quarterfinals

पीव्ही सिंधू, प्रणॉय यांचा Singapore Openच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Singapore Open 2022 : बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी सिंगापुर ओपन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय खेळताना दिसत आहेत. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू आणि फॉर्मात असलेल्या एचएस प्रणॉय यांनी गुरुवारी 14 जुलैला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या मानांकित सिंधूने महिला एकेरीत व्हिएतनामच्या थुई लिन गुयेनचा पराभव केला. त्याचवेळी एचएस प्रणॉयलाही अंतिम आठमध्ये स्थान मिळवण्यात यश आले.(pv sindhu HS Prannoy enter singapore open 2022 quarterfinals)

हेही वाचा: WI vs Ind: वेस्ट इंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहलीला डच्चू

पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनी गुरुवारी सिंगापूर ओपन चॅम्पियनशिपमध्ये शानदार विजय मिळवला. पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत 59व्या स्थानावर असलेल्या व्हिएतनामच्या थुई लिन गुयेनचा 19-21, 21-19, 21-18 असा पराभव केला. त्याचवेळी जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या प्रणयने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनचा 14-21, 22-20, 21-18 असा एक तास नऊ मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना जपानच्या कोडाई नाराओकाशी होणार आहे.

Web Title: Pv Sindhu Hs Prannoy Enter Singapore Open 2022 Quarterfinals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PV Sindhu