WI vs Ind : वेस्ट इंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहलीला डच्चू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India’s squad for T20I series against West Indies announced

WI vs Ind: वेस्ट इंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहलीला डच्चू

India’s squad for T20I series against West Indies announced : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॅरेबियन दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्मा टी-20 मालिकेत संघाचा कर्णधार असेल, तर विराट कोहली संघाचा भाग नसेल.

हेही वाचा: Eng vs Ind 2nd ODI: लॉर्डसवर मालिका विजयाची संधी, विराटला विश्रांतीच!

केएल राहुल आणि कुलदीप यादव यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र हे खेळाडू फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच संघात पुनरागमन करू शकतील. त्याशिवाय आर अश्विनने पुनरागमन केले आहे. या दौऱ्यासाठी विराट कोहलीला संघात स्थान मिळालेले नाही. त्याला एकदिवसीय मालिकेसाठी संघातून विश्रांती देण्यात आली होती, तर बीसीसीआयने टी-20 मालिकेबाबत कोणतीही माहिती न देता त्याला विश्रांती दिली.

हेही वाचा: BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने विराट कोहलीबद्दल केलं मोठ विधान

विराट कोहलीला त्याची दुखापतमुळे विश्रांती देण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे. कारण टीम इंडियाला ऑगस्टच्या शेवटी आशिया कप खेळायचा आहे. उमरान मलिकची सलग तीन मालिकांसाठी निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याला दोन संधी मिळाल्या होत्या, परंतु चौथ्या मालिकेत त्याला वगळण्यात आले आहे. याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनाही वगळण्यात आले आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी हा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा, ईशान किशन, केएल राहुल*, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव*, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह.

*केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचा समावेश फिटनेसवर अवलंबून आहे.

Web Title: Indias Squad For T20i Series Against West Indies Announced Kl Rahul Kuldeep Yadav Part Of Team But Virat Kohli Not Team

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..