

PV Sindhu
sakal
नवी दिल्ली : दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने यंदाच्या मोसमातील उर्वरित स्पर्धांमधून माघार घेतली आहे. पायाला झालेल्या दुखापतीमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी तिने उर्वरित मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. युरोप खंडातील स्पर्धांदरम्यान तिला दुखापत झाली होती.