PV Sindhu: पी. व्ही. सिंधूचा टोकियोत इतिहास! जपान ओपन जिंकत दोन वर्षांचा दुष्काळ संपवला

PV Sindhu Wins Japan Open 2026 Title: पी. व्ही. सिंधूने जपान ओपन 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अकाने यामागुचीचा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. जपान ओपन जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.
PV Sindhu

PV Sindhu

esakal

Updated on

PV Sindhu Wins Japan Open 2026 Title: भारतीय बॅडमिंटनची स्टार खेळाडू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने अखेर मोठ्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. रविवारी टोकियो येथे झालेल्या जपान ओपन २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने यजमान जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ असा सरळ गेममध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.

या विजयासह जपान ओपन जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. तसेच तिच्या कारकिर्दीतील हे पहिले सुपर ७५० स्पर्धेचे विजेतेपद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com